नमस्कार मित्रानो,
आजच्या या ब्लॉग मधे मी तुम्हाला औरंगाबाद जवळील अतिशय सुंदर आणि शहरी गजबजाटा पासून दुर असलेल्या वेताळ वाडी किल्ल्याची माहिती देत आहे.
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबादचा उल्लेख होतो. या जिल्ह्यात इतिहासाच्या अनेक खाणा-खुना आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वेताळ वाडी किल्ला. वाकाटक काळापासून शेकडो वर्षांचा साक्षीदार असलेला हा किल्ला तसा दुर्लक्षितच. मात्र, आजही या ठिकाणी गेल्यावर वास्तुशास्त्राचा हा उत्तम नमुना पाहून डोळ्याचे पारणे फिटते.
कसे जाल:- औरंगाबाद पासून हा किल्ला एक 90 किलोमीटर अंतरावर आहे. औरंगाबाद वरून अजिंठा लेणी जाणाऱ्या रस्त्यावर सिल्लोड हे तालुक्याचे गाव लागेल. तिथुन पुढे जवळपास २० किमी वरती गोळेगाव म्हणून गाव आहे तिथने डावीकडे वळlवे ....पुढे गेल्यानंतर वेताळ वाडी गाव लागेल तिथे तुम्ही कोणालाही किल्ल्याचा पत्ता विचारू शकता.. संपूर्ण रस्ता हा अतिशय निसर्गरम्य आहे...हं रस्ता थोडा खराब आहे.
वेळ – संपुर्ण किल्ला बघण्यासाठी साधारण ३ तास हवेत.
चांगला काळ – आक्टोंबर ते जानेवारी हा चांगला काळ.
इतिहास:-

इसवी सन पाचव्या शतकात बांधला
हा किल्ला कधी आणि कुणी बांधला, या बाबत वेगवेगळ्या इतिहासकारांचे वेगवेगळे संशोधन आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्या घटोत्कच लेण्यातील शिलालेखात अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. तसेच ही लेणी राजे वाकटाकचा मंत्री वराहदेव याने इसवी सन पाचव्या शतकात खोदल्या माहिती आहे. त्यामुळे त्याच दरम्यान हा किल्ला बांधला असावा.
- हा किल्ला वेताळवाडी गावाच्या परिसरात आहे.
या ठिकाणी असलेल्या शरभ शिल्पावरून या किल्ल्यावर यादवांचीही सत्ता होती, हे अधोरेखित होते.
वर्ष 1553 मध्ये अहमदनगरच्या बुर्हान निजामशहाने हा गड जिंकला.
त्यानंतर 1631 मध्ये शहाजहानने तो किल्ला जिंकला.
किल्ल्याची उंची : 3000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा
धन्यवाद
प्रकाश अ. ताकटे

No comments:
Post a Comment